सुळे परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात  

0
28

कळे (प्रतिनिधी) : सुळे परिसरातील सावर्डे,  मल्हारपेठ, मोरेवाडी, वाघुर्डे, सुळे, पणुत्रे, हरपवडे,  वेतवडे,  पणोरे आदी गावांमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहाने व कोरोना नियमांचे पालन करीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  होते.

सावर्डे (ता. पन्हाळा) ग्रा. पं.समोर सरपंच भाग्यश्री बच्चे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मल्हारपेठ येथे सरपंच सीताराम सातपुते,  तर मोरेवाडी येथे सरपंच जयश्री बच्चे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छ्त्रपती शिवाजी वाचनालय व भगतसिंग तरूण मंडळाचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गावातील प्राथमिक शाळा, विकास संस्था,  दूध संस्था येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी,  ग्रामपंचायतीचे  उपसरपंच,  सदस्य,  ग्रामसेवक,  तलाठी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, विविध संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.