जिल्ह्यात २२३९१ कोरोना चाचण्या, ३२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

0
233

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे, यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.  मागील चोवीस तासात २२, ३९१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ३२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून ७३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ६५, आजरा – ०२, भुदरगड – ३, चंदगड -०, गडहिंग्लज – ७, गगनबावडा – ०, हातकणंगले – ६४, कागल – ७,  करवीर – ६०, पन्हाळा – २३, राधानगरी – ४, शाहूवाडी – ०५, शिरोळ – २८, नगरपरिषद क्षेत्र – ५६, इतर जिल्हा व राज्यातील – ३ अशा ३२७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ९९, ३७२ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ८९, ५२०

मृतांची संख्या – ५, ५८२

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४,२७०