गांधीनगरच्या वसाहत रुग्णालयात ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे लसीकरण…

0
298

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आज (शुक्रवार) कोव्हिडचे लसीकरण करण्यात आले. शासकीय वसाहत रुग्णालयामध्ये ही लस रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरपंच रितू लालवानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. यावेळी डॉ. विद्या पॉल यांनी लसीकरणाबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यावेळी साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली.

यावेळी डॉ. बिना रुईकर, डॉ. सुनिता माळवे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. सोनल सोहनी, अधिपरिचारिका सीमा वाल्मिकी, डॉ. दिपाली देसाई, डॉ. स्मिता बचाटे उपस्थित होते.