नोव्हेंबरमध्ये बँकांना १५ दिवस सुट्टी

0
52

मुंबई (प्रतिनिधी) : नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सणासह अनेक मोठे सण येत असल्याने बँकांना १५ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांना मोबाइल बँकिंग, नेटबँकिंगचा आधार घ्यावा लागणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, गुरु नानक जयंती, वांगला महोत्सव, छठ पूजा, सेंग कुत्सनम, निंगोल चक्कौबा, काली पूजा,  कार्तिक पौर्णिमा, रहासा पौर्णिमा असे सण येत आहेत. त्यामुळे स्थानिक सुट्टीसह साप्ताहिक रविवार आणि शनिवारच्या सुट्ट्यासह बँकां १५ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने संपूर्ण देशात नोव्हेंबर महिन्यात बँकांना १५ दिवसांची सुट्टी असेल. ही सुट्टी राजपत्रित, रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि स्थानिक सुटींमुळे असणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सुट्टीच्या दिवसांतही मोबाइल बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय आणि एटीएमद्वारे बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. या सेवांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. परंतु चेक क्लिअरिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.