Published June 3, 2023

नाशिक : येथील मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत कर्मचारी नितीन जोशी यांना देखील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्यानंतर धनगर यांच्या घराची झाडाझडतीचे आदेश अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले असता एकूण 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने हाती लागल्याने एसीबी पथकही चक्रावून गेले.

तपासात लाचखोर सुनीता धनगरांकडे मोठं घबाड सापडलं आहे. धनगर यांच्या घरात तब्बल 85 लाख रोख रक्कम आणि 32 तोळे सोन्याचे दागिने करण्यात हस्तगत आले. त्याचबरोबर धनगरांच्या नावावर 2 आलिशान फ्लॅट आणि एक जागा देखील आहे. उंटवाडी परिसरातील राहत्या फ्लॅटचीच किंमत दीड कोटी रुपये असल्याचे समजते. सुनीता धनगर यांची बँक खाते, लॉकर्स किती? याबाबत तपास सुरु असून, सुनीता धनगरांनी आणखी किती माया कमावली याचा तपशील लवकरच समोर येणार आहे.

एका खासगी शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना काही कारणास्तव संस्थेने निलंबित केले. त्या विरोधात त्याने शैक्षणिक न्यायाधिकरणात दाद मागितली. न्यायाधिकरणाने मुख्याध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र तरीही संस्थेने त्यांना नियुक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे मुख्याध्यापकांनी अर्ज केला. संस्थेला नियुक्ती करण्याबाबतच्या आदेश देण्यासाठी धनगर व लिपिकाने लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले.

September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023