काहीसा दिलासा : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

0
337

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत आज (सोमवार) कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १४, ३०४ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून पैकी ११५८ जणांचे अह्वाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजचा जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर ८.०९ टक्के आहे. एकूण २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून दिवसभरात १२१७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २१२ तर करवीर तालुक्यात २०४ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – २१२, आजरा- २१, भुदरगड- २०, चंदगड- २५, गडहिंग्लज- ३५, गगनबावडा – ०, हातकणंगले – १६७, कागल- ११०,  करवीर- २०४, पन्हाळा- ९५, राधानगरी- ५२, शाहूवाडी – ३०, शिरोळ – ६८, नगरपरिषद क्षेत्र – १०१, इतर जिल्हा व राज्यातील- १८ अशा ११५८ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ८८, ०७० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ६९, ३८५

मृतांची संख्या – ५, २४४

उपचार सुरू असलेले रुग्ण – १३, ४४१