कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ७९ जणांचे कोरोना अहवाल आले आहेत. तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात  ४४४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५८५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १७, आजरा तालुक्यातील ५, चंदगड तालुक्यातील ३,   गडहिंग्लज तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील ११, कागल तालुक्यातील १,करवीर तालुक्यातील ७, पन्हाळा तालुक्यातील २,   राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ७, आणि इतर जिल्ह्यातील १४ अशा एकूण ७९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४४४ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान, करवीर तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील २ आणि इचलकरंजी परिसरातील १ अशा ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७,२९०    

एकूण डिस्चार्ज ४३,३०९

उपचारासाठी दाखल रुग्ण २,३८७

एकूण मृत्यू १,५९४ इतके झाले आहेत.