कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६२७ जण कोरोनाबाधित : ६३७ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल ६२७ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ६३७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १५०७  जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ९.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १५५, आजरा तालुक्यातील १०, भूदरगड तालुक्यातील १२, चंदगड तालुक्यातील २९, गडहिंग्लज तालुक्यातील ३१, गगनबावडा तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील ६८, कागल तालुक्यातील ११, करवीर तालुक्यातील १०४, पन्हाळा तालुक्यातील १६, राधानगरी तालुक्यातील १०, शाहूवाडी तालुक्यातील ६, शिरोळ तालुक्यातील ४०, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १०६ आणि इतर जिल्ह्यातील २६  अशा एकूण ६२७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ६३७ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान, तब्बल १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४२,०७६.

एकूण डिस्चार्ज ३०,९०९.

उपचारासाठी दाखल रुग्ण ९८३१.

तर आजअखेर कोरोनामुळे १३३६ एकुण मृत्यू झाले आहेत.

Live Marathi News

Recent Posts

‘एक दिवा शहीदांसाठी’ : निगवे परिसरातील गावांमध्ये कॅन्डल मार्च

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात…

2 hours ago

‘या’ दोघांना तात्काळ अटक करा : शैलेश बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका प्रकरणातील मोक्याची…

3 hours ago

मुरगूड नगरपरिषदेला शेतकऱ्यांचा दणका…

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडमध्ये काल (रविवार)…

4 hours ago