Published October 20, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ५१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १५३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६७३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २७, चंदगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील १, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४,  कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण ५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर १५३ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील १,चंदगड तालुक्यातील १, भुदरगड तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १ आणि बेळगावमधील चिकोडी येथील १ अशा ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७,४७८.    

एकूण डिस्चार्ज ४३,९१२.  

उपचारासाठी दाखल रुग्ण १९५९.

एकूण मृत्यू १६०७ झाले आहेत.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023