कोल्हापुर जिल्ह्यात चोवीस तासात ४६१ जण कोरोनाबाधित : ७८८  कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ४६१ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर दिवसभरात ७८८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, चोवीस तासात तब्बल २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर  ११६९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ९ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १३०, आजरा तालुक्यातील ३, भूदरगड तालुक्यातील १७, चंदगड तालुक्यातील १३, गडहिंग्लज तालुक्यातील २०, हातकणंगले तालुक्यातील ५०, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील  ५४,पन्हाळा तालुक्यातील २५, राधानगरी तालुक्यातील ७, शाहूवाडी तालुक्यातील ३७, शिरोळ तालुक्यातील १६, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील  ५४ आणि इतर जिल्ह्यातील ३३ अशा एकूण ४६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ७८८ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान, आज तब्बल २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४०,२६२.

एकूण डिस्चार्ज २८,६०२.

उपचारासाठी दाखल रुग्ण  १०,३८२.

तर कोरोनामुळे जिल्ह्यात १२७८ मृत्यू झाले आहेत.

Live Marathi News

Recent Posts

कळे येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक : २.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळे (प्रतिनिधी) : घरात अवैधरित्या देशी-विदेशी…

16 hours ago

बी, सी, डी वॉर्डसह उपनगरात सोमवारी पाणी नाही येणार….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील ए,…

17 hours ago

पणोरे ग्रामस्थांतर्फे शहिदांना आदरांजली…

कळे (प्रतिनिधी) : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद…

17 hours ago

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासांत १० जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

18 hours ago