कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ४६ कोरोनामुक्त : तर ४० जण कोरोनाबाधित

0
47

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५८६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २०, भूदरगड तालुक्यातील १, चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील २, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील ४, शाहूवाडी तालुक्यातील १,  इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा ४० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सांगली जिल्ह्यातील विट्यामधील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,४८४.

एकूण डिस्चार्ज : ४६,१०१.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ७२७.

कोरोनामुळे एकूण मृत्यू १,६५६ झाले आहेत.