कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नव्या ४९३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, दिवसभरात ६२९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६०५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १५०, आजरा तालुक्यातील २, भूदरगड तालुक्यातील ७, चंदगड तालुक्यातील १०, गडहिंग्लज तालुक्यातील ११, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४९, कागल तालुक्यातील १९, करवीर तालुक्यातील ८६, पन्हाळा तालुक्यातील ३५, राधानगरी तालुक्यातील १५, शाहूवाडी तालुक्यातील ७, शिरोळ तालुक्यातील १८, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४७ आणि इतर जिल्ह्यातील ३६ अशा एकूण ४९३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ६२९ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान, आज तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३९,८०१.   

एकूण डिस्चार्ज  २७,८१४.

सध्या उपचारासाठी दाखल रुग्ण १०,७३०. 

तर आजअखेर जिल्ह्यात १२५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here