कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल ३४ जणांचा कोरोनाने बळी घेतले आहेतर. तर नव्या ६२५ कोरोना रुग्णांची भर पडली. दरम्यान, दिवसभरात ८९५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १२१३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ८.३० वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १५१, आजरा तालुक्यातील १२, भूदरगड तालुक्यातील ५३, चंदगड तालुक्यातील २५, गडहिंग्लज तालुक्यातील २१, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ६३,  कागल तालुक्यातील १३, करवीर तालुक्यातील ७०, पन्हाळा तालुक्यातील ३३, राधानगरी तालुक्यातील १४, शाहूवाडी तालुक्यातील १७, शिरोळ तालुक्यातील १३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४४ आणि इतर जिल्ह्यातील ९५ अशा एकूण ६२५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८९५ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान आज तब्बल ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८२७९.

एकूण डिस्चार्ज २६,२५७.

उपचारासाठी दाखल रुग्ण १०,८२६.

तर आजअखेर ११९६ कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

Live Marathi News

Recent Posts

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार : एकावर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून…

4 hours ago

..अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करू : अमोल देशपांडे

हुपरी (प्रतिनिधी) : हुपरी नगरपरिषद हद्दीमधील…

4 hours ago