कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ३२ कोरोनामुक्त : तर ४६ पॉझिटिव्ह

0
83

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ वाजल्यापासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ४६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८७५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हापूर शहरातील १०, चंदगड तालुक्यातील ३, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ५, करवीर तालुक्यातील ७, शाहूवाडी तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील ५, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १२ आणि इतर जिल्ह्यातील अशा ४६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४८,१८९.

एकुण डिस्चार्ज ४५,५६४.

उपचारासाठी दाखल रुग्ण ९८२.

तर आजअखेर एकूण मृत्यू १६४३ झाले आहेत.