कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ८६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३१९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९८३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ३५, आजरा तालुक्यातील ४, भूदरगड तालुक्यातील १, चंदगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील ७, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ७, कागल तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील ८, पन्हाळा तालुक्यातील ३, राधानगरी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा एकूण ८६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३१९ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील १ आणि साताऱ्यामधील पाटण तालुक्यातील १ अशा २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७,३७६.    

एकूण डिस्चार्ज ४३,६२८.  

उपचारासाठी दाखल रुग्ण २१५२.

एकूण मृत्यू १५९६ झाले आहेत.