कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३१६ जण कोरोनाबाधित : ३३५ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ३१६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३३५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १४२१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ९१, आजरा तालुक्यातील १, भूदरगड तालुक्यातील ११, चंदगड तालुक्यातील १९, गडहिंग्लज तालुक्यातील २४, गगनबावडा तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील २४, कागल तालुक्यातील ५, करवीर तालुक्यातील २६, पन्हाळा तालुक्यातील ४, राधानगरी तालुक्यातील ११, शाहूवाडी तालुक्यातील २०, शिरोळ तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४९ आणि इतर जिल्ह्यातील २७ अशा एकूण ३१६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३३५ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील १, भुदरगड तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, आजरा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १,हातकणंगले तालुक्यातील २, शहापूर इचलकरंजीमधील १, पन्हाळा तालुक्यातील १ आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील १, चिकोडी बेळगावमधील १, सातारा जिल्ह्यातील कराडमधील १ अशा तब्बल १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५,०६९.

एकूण डिस्चार्ज ३४,८६४.

सध्या उपचारासाठी दाखल रुग्ण ८७२९.

तर आजअखेर एकूण मृत्यू १४६६ झाले आहेत.

Live Marathi News

Recent Posts

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होणार मुख्यमंत्री..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे राज्यपाल…

1 hour ago

अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील महाविकास आघाडी…

3 hours ago

कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…

16 hours ago