कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १९५ जण कोरोनाबाधित : दिवसभरात ९२९ कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १९५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ९२९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९९६  जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ८६, आजरा तालुक्यातील १, भूदरगड तालुक्यातील ३, चंदगड तालुक्यातील ८, गडहिंग्लज तालुक्यातील ४,  हातकणंगले तालुक्यातील १५, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील १७, पन्हाळा तालुक्यातील ५,  राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १२, शिरोळ तालुक्यातील ९,  इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २२ आणि इतर जिल्ह्यातील १० अशा एकूण १९५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ९२९ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर-कदमवाडी १,करवीर तालुक्यातील १, चंदगड तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, शिरोळ १, गारगोटी १, वाळवा तालुक्यातील १, गडहिंग्लज १, आजरा १, इचलकरंजी शहर १, कागल १ अशा ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४६,३७७.

एकूण डिस्चार्ज ३८,५२२.

उपचारासाठी दाखल रुग्ण ६३३०.

एकूण मृत्यू १५२५.

Live Marathi News

Recent Posts

कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…

3 hours ago

महिला दिनानिमित्त अंध भगिनींसाठी जेऊर येथे आगळा उपक्रम

पन्हाळा (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर…

4 hours ago