कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हय़ात आज (सोमवार) गेल्या २४ तासांत कोरोनाने ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,९१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून १,२९७ कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यांमध्ये आजरा ३६, भुदरगड ६८, चंदगड ६३, गडहिंग्लज ८६, गगनबावडा १३, हातकणंगले १८९, कागल ५३, करवीर ३०३, पन्हाळा १४६, राधानगरी २६, शाहूवाडी २९, शिरोळ २९, नगरपालिका क्षेत्रात २२०, कोल्हापुरात ४३३ तर अन्य ७४ जणांचा समावेश आहे. तर एकुण कोरोनाची रूग्णसंख्या १,१३,२६९ झाली आहे.