कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १६७ जण कोरोनाबाधित:  दिवसभरात ३०० कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३०० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११८७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ५०, आजरा तालुक्यातील ५, भूदरगड तालुक्यातील ४, चंदगड तालुक्यातील १०, गडहिंग्लज तालुक्यातील ५,  हातकणंगले तालुक्यातील १३, कागल तालुक्यातील ९, करवीर तालुक्यातील १४, पन्हाळा तालुक्यातील ९,  राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील  ४, शिरोळ तालुक्यातील ७, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २३ आणि इतर जिल्ह्यातील १२ अशा एकूण १६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३०० जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील २,करवीर तालुक्यातील २,भुदरगड तालुक्यातील १,हातकणंगले तालुक्यातील २,कुरंदवाड मधील २, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,तासगाव मधील १ आणि बेळगावमधील १ अशा १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४६,१८२.

एकूण डिस्चार्ज ३७,५९३.

उपचारासाठी दाखल रुग्ण ७०७५.

आजअखेर एकूण मृत्यू १५१४ झाले आहेत.

Live Marathi News

Recent Posts

कळे येथे बांधकाम कामगार, आशा गटप्रवर्तकांचे आंदोलन…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी…

11 hours ago

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शहिदांना आदरांजली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेना जिल्ह्याच्या…

12 hours ago

इतर महत्त्वाची शासकीय कार्यालयेही कागलला नेणार का ?

करवीर (राहुल मगदूम) : नुसते ग्रामसेवक…

12 hours ago

‘आप’च्या वतीने छ. शिवाजी चौकात संविधानाचे वाचन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या…

12 hours ago

किराणा दुकानात गुटखाविक्री करणाऱ्यास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : किराणा मालाच्या दुकानामध्ये…

12 hours ago

बहिरेश्वरच्या सरपंचांविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर…

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर…

13 hours ago