कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात १३२ जण कोरोनाबाधित; दिवसभरात २९० कोरोनामुक्त

0
52

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १३२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात २९० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १९७५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ३०, आजरा तालुक्यातील १, भूदरगड तालुक्यातील ६, चंदगड तालुक्यातील ८, गडहिंग्लज तालुक्यातील ८, हातकणंगले तालुक्यातील ८,  कागल तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ६, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील ४, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ३३ आणि इतर जिल्ह्यातील २० अशा एकूण १३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर १० जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान करवीर तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, भुदरगड तालुक्यातील १, मुंबई मधील १, सांगली जिल्ह्यातील १, सातारा जिल्ह्यातील १, बेळगाव जिल्ह्यातील १ अशा तब्बल १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या : ४६,५०९.

एकूण डिस्चार्ज मिळालेले : ३८,८१२.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ६१६२.

एकूण मृत्यू  : १५३५.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here