कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त : तर ५६ जण कोरोनाबाधित

0
54

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ५६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६२५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १७, भूदरगड तालुक्यातील १, चंदगड तालुक्यातील १, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २, कागल तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील ८, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील ६, शिरोळ तालुक्यातील ५, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा एकूण ५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चंदगड तालुक्यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८०७२.

एकूण डिस्चार्ज : ४५४८२.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ९५०

एकूण मृत्यू : १६४० झाले आहेत.