कोल्हापूर शहरात फेरीवाला संघटना आणि महापालिका प्रशासन संघर्ष अटळ (व्हिडिओ)

0
83

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका प्रशासनाने शहरातील वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या  फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली असून या कारवाईला फेरीवाल्यांनी प्रखर विरोध करत आंदोलन सुरू केले आहे.

महाद्वार चौकातील फेरीवाल्यांना ताराबाई रोडवर पट्टे मारून चौक आखून दिले आहेत. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने सुरू केली आहे. त्यानिमित्ताने रस्त्यावरील फेरीवाल्यांना आपले व्यवसाय हलवण्यासाठी काही वेळ अतिक्रमण विरोधी पथकाने दिला आहे.  तर या कारवाईला विरोध करण्याची भूमिका फेरीवाला संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे फेरीवाला विरुद्ध महापालिका प्रशासन असा संघर्ष अटळ बनला आहे. महापालिकेच्या प्रशासक म्हणून आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी विनापरवाना आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबाबत ठाम भूमिका घेतली आहे.