कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५८ नागरिकांकडून २९ हजार, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या २ नागरिकांकडून २ हजार व सोशल डिस्टंन्स न ठेवलेल्या २ नागरिकांकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या सात भरारी पथकामार्फत शहरात कारवाई करुन ६२ नागरिकांकडून ३३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मीपुरी परिसर, गंगावेश, रंकाळावेश, उतरेश्वर, लक्षतिर्थ वसाहत, महाद्वार रोड, शिवाजी  पेठ, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, खासबाग, जवाहरनगर, उद्दयमनगर, प्रतिभानगर, शाहुनगर, राजारामपुरी परिसर, शाहुपुरी परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेन्द्रनगर, सायबर  चौक, मार्कट यार्ड, रुईकर कॉलनी, कदमवाडी, सदर बाजार, कसबा बावडा, लाईन बाजार, ताराबाई  पार्क, नागाळा पार्क, एसटीस्टॅण्ड परिसर, रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली.

अग्निशमन विभागाच्यावतीने शहरातील मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन, मोठी दुकाने येथे दैनंदिन तपासणी व प्रबोधन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्या पथकामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच केएमटीमधील प्रवाशांची दोन डोस पूर्ण असल्याची तपासणी करण्यात येत आहे. शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्क व सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.