कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात स्वतःची जागा आणि घर खरेदी करून देतो. असे सांगत गेल्या चार वर्षांत चेक आणि रोख स्वरुपात असे १५ लाख रुपये घेवून जमीन आणि घर परस्पर दुसऱ्याला विक्री करून १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलायं. याबाबतची फिर्याद श्रीमती पुजा प्रकाश राजापुरकर (वय ४७, रा. चव्हाण कॉलीनी, कंळबा जेल समोर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. तर महेश रामचंद्र गायकवाड (रा. पंचरत्न विहार अपार्टमेंट, सुर्वे कॉलीनी, सानेगुरुजी) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीमती पुजा राजापुरकर यांच्याकडून महेश गायकवाड यांनी दि. २० मे २०१५ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत स्वतःची जागा आणि घर देतो असे सांगितले. तसेच वारंवार रोख आणि चेक स्वरूपात १५ लाख रुपये घेतले आहेत. मात्र, महेश गायकवाड याने ही जमीन आणि घर पुजा यांना खरेदी न करुन देता परस्पर दुसऱ्याला विक्री केले.

त्यामुळे पुजा यांनी महेश याला पैशांसाठी वारंवार विचारणा केली असता त्याने पैसे देण्यास टाळाटाळ करुन धमकीही दिली. यामुळे पुजा राजापुरकर यांनी १५ लाखांच्या फसवणूक प्रकरणी महेश याच्यावर फिर्याद दाखल केली आहे.