कोल्हापुरात बंगला फोडून ६० हजारांचा मुद्देमाल लंपास

0
59

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दसरा चौकातील सीता कॉलनीमधील एका बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी  रोख रक्कम व दागिने असा सुमारे ६० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी प्रदीप दत्तात्रय पाटील (वय ३०) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सीता कॉलनीमध्ये राहणारे प्रदीप पाटील हे काही कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील मंगळसूत्र व चाळीस हजार रुपये असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी घरी आल्यानंतर हा प्रकार प्रदीप पाटील यांच्या निदर्शनास आली.