नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे खतरनाक झिका विषाणूमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका विषाणूचे राज्यात १४ रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा १५ वर पोहचला असल्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, झिका विषाणूच्या लक्षणे आणि परिणामांवर आम्ही काटेकोर लक्ष ठेऊन आहोत. त्यामुळे राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका विषाणू पसरण्यापासून थांबवण्यासाठी अॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. केरळमध्ये या विषाणूची पहिली लागण होणारी व्यक्ती गर्भवती महिला होती. ही महिला आणि तिचे बाळ आता बरे होण्याच्या मार्गावर आहेत.

झिका विषाणूचे १९ सॅम्पल पुण्यातील एनआयवीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील १३ सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा १४ सॅम्पल टेस्टसाठी पाठवले आहेत. त्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.