‘केडीसीसी’ बँकेत ना. सतेज पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

0
702

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकीत आमदारपदी पालकमंत्री सतेज पाटील यांची  बिनविरोध निवड झाल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही गगनबावडा तालुका  विकास संस्था गटातून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

ना. पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचे दोन डमी अर्ज वगळता उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज (शुक्रवार) शेवटच्या दिवशी या गटातून कोणताच उमेदवार अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे ना. सतेज पाटील यांची केडीसीसी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. तर त्यांच्या गटाचे दीपक लाड व महादेव पडवळ यांचे डमी अर्ज मागे घेण्याची  केवळ औपचारिकता बाकी आहे. गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून पी. जी. शिंदे नेतृत्व करत आहेत.  त्यांनी या निवडणुकीसाठी स्वत: अर्ज दाखल न करता पत्नीचा महिला गटातून अर्ज दाखल केला  आहे.

दरम्यान,गगनबावडा तालुक्यातून सेवा संस्था गटातून ६६ संस्था मतदानासाठी पात्र आहेत. त्यापैकी ४९ संस्थांच्या ठरावधारक मतदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत ना. सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचवेळी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.