इचलकरंजी (प्रतिनिधी) : भाजपा सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इचलकरंजी शहरात आज भाजपाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आ. सुरेश हाळवणकर यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी भाजपा शहराध्यक्ष शहाजी भोसले, भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयजीएम हॉस्पिटल आणि परीसरामधे स्वच्छता अभियान तसेच औषध फवारणी करण्यात आली.

या उपक्रमात जयदीप पाटील, भरत जोशी,चंद्रकांत जासुद, दिपक तेलवे, शिवानंद रावळ, संभाजी माने, अविनाश लोखंडे,शिवाजी बिरंजे, गणेश फिसके,फूलचंद यादव,राहुल ठोबरे,पिंटू लाटने, उमेश आमणे, अशिष खंडेलवाल, इलाही नाईकवाडे आदींनी सहभाग घेतला होता.