पूजा चव्हाण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

0
136

पुणे (प्रतिनिधी) : बी़ड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवाशी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव समोर आले आहे. तर या प्रकरणाच्या पोलीस तपासातून धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. 

पूजाने आत्महत्या करण्याच्या आधी दारु प्यायली होती, अशी माहिती पूजासोबत राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या मित्राने पोलिसांना दिली आहे. यावरुन पूजा दारु पिली होती की कोणी जबरदस्ती करुन तिला पाजली होती?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्स बंजारा भाषेत आहेत. त्याच्या भाषांतराचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. तिचा मृत्यू आत्महत्येनेच झाला आहे, असे रिपोर्टमध्ये नोंदवलेले नाही, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली. पूजा चव्हाण प्रकरणाची भाजपने  लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.