आजरा तालुक्यात दिवसभरात तिघांना कोरोनाची लागण…

0
340

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील ६६ वर्षीय पुरुष आणि मुमेवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, अनेक नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

काल (शुक्रवार) आठवडी बाजारादिवशी मोठी गर्दी होती. मात्र, अनेक नागरिक विनामस्क फिरत होते. याबाबत प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे. मास्कबाबत कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल. आज त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.