मुंबई (प्रतिनिधी) :  कोरोनापासून जगाची सुटका करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. भारताने यापूर्वी शेजारच्या देशांना कोरोना व्हॅक्सिन पाठवले आहे. त्यापाठोपाठ आता ब्राझीलला  देखील हे औषध पाठवले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जेअर बोलसोनारो यामुळे चांगलेच आनंदी झाले आहेत. त्यांनी रामायाणातील संजीवनी औषध घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

या ट्वीटमध्ये ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो यांनी, नमस्कार नरेंद्र मोदी अशी केली आहे. ‘जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.’ असं त्यांनी ट्वीट केलं आहे. हे ट्विट प्रामुख्यानं ब्राझीलच्या स्थानिक भाषेतील असलं तरी त्याची सुरुवातीला नमस्कार आणि शेवटी धन्यवाद हा भारतीय भाषेतील शब्द त्यांनी वापरला आहे.