भर पत्रकार परिषदेत खासदाराने महिला आमदाराचा ओढला गाल..! (व्हिडिओ)

0
61

कोलकाता  (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमधील एका तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने एका महिला आमदाराचा गाल ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभेचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार  एका महिला आमदाराचा गाल भर पत्रकार परिषदेत ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  यावरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.  

तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी  आपल्याच पक्षाच्या एका महिला आमदाराचा गाल ओढत आहेत. टीएमसी अशाच प्रकारे महिला सक्षमीकरण करत आहे की काय?   टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी बांकुराच्या महिला आमदाराचा गाल ओढत आहेत. जी तिकीट न मिळाल्याने नाराज होती. अरे, लाज वाटली पाहिजे, अशी टीका लॉकेट चॅटर्जी यांनी केली आहे. कल्याण बॅनर्जी यांच्या या व्हिडिओवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मात्र, या व्हिडिओबाबत कल्याण बॅनर्जी यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.