कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ३३ जणांना कोरोनाची लागण तर दोघांचा मृत्यू

0
325

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शुक्रवार) आणखी ३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १० जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १,१५५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १९, आजरा तालुक्यातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील ५, हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील १ आणि इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ अशा ३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोल्हापूर शहरातील  बिंदू चौक १ आणि टिंबर मार्केट येथील १ अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,३७०.

डिस्चार्ज – ४८,३८३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – २४४.

मृत्यू – १७४३.