कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार करावेत  : जिल्हा नागरी कृती समितीची मागणी

0
282

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर शहरातील रस्त्यांचे काम दर्जेदार करण्यात यावे. अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने करण्यात आज (शनिवार) करण्यात आली. आली. यावेळी शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोरील सुमारे २५ वर्षानंतर सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामाची पाहणी महापालिका उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, ठेकेदार गणेश खाडे यांच्या समवेत करण्यात आली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी, या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम शासनाच्या नियमानुसार टेंडर प्रमाणे सुरू असून हे काम दर्जेदार होईल असे आश्वासन दिले. यावर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सध्या सुरू असणारे रस्त्यांचे काम दर्जेदार करा, पुन्हा पुन्हा दुरुस्ती करायला लागू नये अशी मागणी केली. तर रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर या कामांचे कोर काढून शासकीय प्रयोगशाळेत तपासून घेणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये गैरप्रकार आढळल्यास महापालिकेला ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने काम करून घेण्यास भाग पाडू, असा इशारा ही कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे,भाऊ घोडके, संभाजी जगदाळे, सुरेश पाटील, लहुजी शिंदे, रणजित पवार ,राजेश वरक अनिल पाटील, रमेश पवार, महेश जाधव, गिरीश आरेकर,किशोर घाडगे,आत्माराम शिंदे, चंद्रकांत पाटील, दिलीप टोणपे यांच्यासह शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.