Published October 7, 2020

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळ्यामध्ये ८ सप्टेंबर २०२० मध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला होता. या पावसामुळे पन्हाळागड आणि गडाखालील असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गडावर तरी रस्त्याचे खच्चीकरण झाले.

त्याचबरोबर गडाखाली असलेल्या मंगळवार पेठ ते पन्हाळा या पायवाटेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गडाखाली राहणाऱ्या लोकांना गडावर प्रवेश करण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या. कारण या वाटेमध्ये लहान-मोठे दगड, भरपूर तण व चिखल होता, शिवाय हा रस्ता व्यवस्थित नव्हता.

तर अशा लोकांना होणाऱ्या अडचणी पाहून मंगळवार पेठेतील वयस्कर मंडळी त्यामध्ये विरुपाक्ष लुपणे, बाबुराव मनेर, लहू गवळी. हे व्यक्ती गडाखालील असलेल्या लोकांना गडावर कश्या पद्धतीने व्यवस्थित या पाय वाटेने जातील हा, उद्देश ठेऊन ही सर्व मंडळी एकत्र आलीत. आणि श्रमदानातून या लोकांनी स्वखर्चातून आणी काही लोकांची मदत घेऊन या कामाची सुरुवात २६ सप्टेंबर २०२० या रोजी केली. पहिल्या दिवशी या लोकांना मंगळवार पेठ गावातील सुनील मुळे, संतोष जंगम,शिवाजी पुजारी या लोकांनी श्रमदानासाठी मदत केली आणि या कामाची पूर्तता विरुपाक्ष लुपणे, लहू गवळी, बाबुराव मणेर, बाबुराव पाटील या सर्वांनी २६ सप्टेंबर २०२० ते आज (बुधवार) या दिवसांमध्ये ही पायवाट आगदी व्यवस्थित केली. त्यामुळे गडाखाली आपटी, नेबापूर, मंगळवार पेठ येथील लोक आता अगदी व्यवस्थित रित्या गडावर प्रवेश करू शकतील.

या लोकांनी समाजामध्ये युवकांसमोर एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. ही लोक वयस्कर असून या सर्वांनी श्रमदानातून अतिशय महत्त्वपूर्ण लोकसेवेचे कार्य केले आहे. त्यामुळे पन्हाळा तालुक्यात सर्वत्र या लोकांचे कौतुक होत आहे.

October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023