शाळा-कॉलेज सुरू करण्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांचे महत्त्वाचे ट्विट

0
55

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यभर सर्वच सार्वजनिक ठिकाण बंद आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे अनेक उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे आता शाळा-कॉलेजेस सुद्धा उघडण्याच्या होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरीही सर्वांनी काळजी घेणे अनिवार्य आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असताना मुंबई आणि ठाण्यात मात्र ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यानंतर रोहित पवार यांनी संभ्रमात असलेल्या पालकांसाठी ट्विट केले आहे. “शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन तिथल्या करोनाच्या परिस्थितीनुसार घेईल. जिथं शाळा सुरू होतील, तिथं सुरक्षेची संपूर्ण काळजी घ्यावी. आणि जिथं शाळा सुरू होणार नाहीत, तिथल्या मुलांनी काळजी करु नये. तिथेही योग्य वेळी शाळा सुरू होतील, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तणावमुक्त रहावं”, असा दिलासा देणारे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.