मुंडे यांच्याबाबत शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

0
126

मुंबई (प्रतिनिधी) : बलात्काराचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुलासा केला आहे. धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. कोणावरही अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हायचे, अशी प्रथा पडू शकते असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

ते म्हणाले, धनंजय मुंडेंवरील आरोपांसंबंधी सर्व माहिती घेतली आहे. पक्षातील सर्व सहकाऱ्यांशी सविस्तर विचार विनिमय, त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी विनंती केली आहे. परिस्थिती पूर्णत: माहीत नसल्याने गंभीर या शब्दाचा वापर केले होते. पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.