नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी उपायुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छताविषयक तक्रारीची आरोग्य कर्मचाऱ्यांनी जागेवरच सोडवणूक करावी, असे निर्देश उप-आयुक्त निखिल मोरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले.

उप-आयुक्त निखिल मोरे आणि सहायक आयुक्त संदिप घार्गे यांनी अचानकपणे शहरातील कळंबा फिल्टर हाऊस येथील सॅनिटरी वॉर्ड ऑफिसमधील ए-१ व ए-२ या विभागांना सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांशी संवाद साधून स्वच्छता कामाची माहिती घेतली. तसेच हजेरीपत्रक तपासून उपस्थितीबाबत पडताळणी केली. दोन्ही ठिकाणचे कर्मचारी उपस्थित होते, व कामही सुरु असल्याचे दिसून आले. महापालिकेने स्वच्छतेच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून कर्मचाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील स्वच्छतेच्या कामात कसूर करु नये, अशी सूचनाही उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केली. नागरिकांच्या स्वच्छतेसंदर्भातील अडचणी तसेच प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्याची सूचनाही त्यांनी कर्मचाऱ्यांना केली.