जालना  (प्रतिनिधी) : येत्या १६ तारखेला राज्यातील ५११ जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी सुरुवातीलाच ५० हजार ११ हेल्थ वर्कर्सना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट  ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, बर्ड फ्ल्यूचे माणसाला होण्याचे प्रमाण कमी असून पण ते झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. परिणामी यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. जगात बर्ड फ्ल्यूचा मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याचे प्रमाण कमी असले, तरी ते गंभीर असू शकतात. शिवाय त्याची बरीच लक्षणे कोविड सारखी आहेत. त्यामुळे या बाबत काळजी घेणे गरजेचे आहे.