पूजा चव्हाण प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती 

0
75

नागपूर (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नांव समोर आले आहे. या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकऱणातील समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्स्वरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून ठाकरे सरकारसह शिवसेनेची कोंडी झाली आहे. आता यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मंत्री देशमुख म्हणाले की,  पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वनमंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल. याबाबत पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल. त्यानंतर राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.