‘कोगे’च्या सरपंचपदाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय

0
117

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कोगे येथील सरपंचपदाबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हे पद सर्वसाधारण वर्गासाठीच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सदस्य विश्वास पाटील यांची याबाबत आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती. आज (सोमवार) सुनावणीवेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी ही याचिका फेटाळली. महसूल प्रशासनाने पूर्वी सरपंचपदासाठी राबवलेली प्रक्रिया बरोबर आहे, असे त्यांनी निकालपत्रात म्हटले आहे. यामुळे कोगे येथे सरपंच सर्वसाधारण गटातील सदस्य होणार हे निश्चित झाले आहे.