रांगोळी (प्रतिनिधी) : सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी रांगोळी गावाला आज (शनिवार) भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्ती विसर्जनाबाबत सूचना दिल्या.

यावेळी सर्वांनी मिरवणूक न काढता तसेच गणेश विसर्जन नदी व विहीरीमध्ये न करता कृत्रिम कुंडात करण्याचे आवाहन केले. तसेच गणेश विसर्जन मिरवणूक काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. यावेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर, पोलीस पाटील सचिन महाजन आदीसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.