यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीची अंमलबजावणी शुक्रवारपासून करा, अन्यथा…

कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा इशारा

0
98

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शासन स्तरावरुन जाहीर करण्यात आलेली महागाई भत्त्याप्रमाणे मजुरीवाढ यंत्रमाग कामगारांना देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सहायक कामगार आयुक्तांनी चालू वर्षासाठी महागाई भत्त्याप्रमाणे जाहीर केलेल्या मजुरीवाढीची अंमलबजावणी शुक्रवारपासून न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज (गुरुवार) कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.

मागील तीन वर्षांपासून महागाई भत्त्याप्रमाणे यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्व कामगार संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या असून नुकताच सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी जाहीर केलेली यंत्रमाग कामगारांसाठी ५२ पिकास प्रति मीटर ८ पैसे आणि जॉबर, कांडीवाले, दिवाणजी, चेकर, मेंडर या कामगारांना १० टक्के मजुरीवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व कामगार संघटना संयुक्त कृती समितीने दिला आहे.

या बैठकीस कृती समितीचे भरमा कांबळे, धोंडिबा कुंभार, आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, सुनील बारवाडे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, बंडोपंत सातपुते, रियाज जमादार आदी उपस्थित होते.