कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनंत चतुर्थी दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने शहरातील विविध भागात विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. तरुण मंडळाच्या सार्वजनिक गणेशमूर्ती मंडपातूनच विसर्जनासाठी नेण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी वाहने आणि मनुष्यबळ यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

डॉ. बलकवडे म्हणाल्या की, इराणी खण येथे महापालिकेच्यावतीने ५ जेसीबी, १२ डंपर, ६ पाण्याचे टँकर, २ बुम, ९० टॅम्पो, प्रत्येक टँम्पोमध्ये २ हमाल असे एकूण १८० हमाल, ७ वैदयकिय पथके, इराणी खणी येथे गणेश मुर्ती उतवविण्यासाठी ८० हमालांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच तरुण मंडळे, तालीम मंडळे यासह विविध सार्वजनिक गणेश मूर्ती त्यांच्या मंडपातूनच नेण्याची सोय महापालिकेने केली आहे. त्यासाठी टेम्पो आणि सोबत कर्मचारी असणार आहेत. ज्या सार्वजनिक मूर्ती मंडळे इराणी खणीवर आणतील त्या मूर्ती सोबत फक्त ५ जणांनाच इराणी खणीपर्यंत जाता येणार आहे.

तसेच विभागीय कार्यालय क्र. १ गांधी मैदान अंतर्गत तांबट कमान, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, निकम पार्क नजिक, मैलखड्डा निर्माण चौक, जरगनगर कमानी समोर, क्रशर चौकाच्या वरील बाजूस पांडूरंग हॉटेल जवळ, पतौडी खण, शाहू सैनिक तरुण मंडळ (राज कपूर पुतळयाजवळ) सोय करण्यात आली आहे. विभागीय कार्यालय क्र. २ छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत तोरस्कर चौक, गंगावेश चौक, पंचगंगा नदी घाट, बिंदू चौक, मिरजकर तिकटी.

विभागीय कार्यालय क्र. ३ राजारामपुरी अंतर्गत व्यापारपेठ पाण्याची टाकी, कोटीतीर्थ तलाव, राजारामपूरी ९ वी गल्ली रेणुका मंदिर, राजाराम तलाव, राजारामपुरी गार्डन जगदाळे हॉल, टेंबलाई मंदिर, सायबर चौक, मनोरा हॉटेल पिछाडीस. विभागीय कार्यालय क्र. ४ ताराराणी मार्केट अंतर्गत सासने ग्राऊंड, नर्सरी बाग, दत्त मंदिर कसबा बावडा, प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी याठिकाणी घरगुती गणेश मुर्ती विसर्जन करिता महापालिकेमार्फत कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.