कळेतील पुरग्रस्तांना तातडीची मदत, नुकसान भरपाई मिळावी : जनसुराज्यची मागणी 

0
22

कळे (प्रतिनिधी) :   यावर्षी  आलेल्या  महापुरामुळे  कळे  येथील  व्यापारपेठेचे  मोठे नुकसान  झाले आहे.  अचानक आलेल्या या महापुरामुळे लोकांना  त्यांचे  साहित्य  सुरक्षितस्थळी  हालविता आले नाही.  छोटे – मोठे  व्यावसायिक,  दूध उत्पादक, शेतकरी  आणि  ग्रामस्थांना या महापुराचा मोठा  फटका बसला आहे.

या नुकसानग्रस्तांना  तातडीची  मदत आणि नुकसान  भरपाई  शासनाकडून  त्वरित  मिळण्यासाठी  जनसुराज्य   शक्ती  पक्षाचे आ.  विनय कोरे यांनी  लक्ष घालावे. अशी मागणी  जनसुराज्यच्या कार्यकत्यांनी आ. कोरे यांना निवेदनाद्वारे केली.

यावेळी एकनाथ पाटील,  संजय  पाटील,  राहूल  व्हंडराव,  विलास  देसाई, अमर  पाटील, उदय  नाईक,  मानसिंग  भोसले, राऊ  पाटील आदी उपस्थित  होते.