शहीद अशोक कामटे यांची साकारली प्रतिमा

0
29

सोलापूर (प्रतिनिधी) : मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षं उलटली आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांना वीरमरण आले. त्यांना श्रद्धांजली म्हणून २६ नोव्हेंबरला स्पर्शरंग कला परिवाराने सोलापूर पोलीस मुख्यालयात कामटे यांची ७० फुटांची दगडी खडीपासून बनवण्यात आलेली प्रतिमा साकारली आहे.

ही प्रतिमा तयार करण्यासाठी २ दिवस लागले. एक ब्रास खडी वापरून ३० तास राबून या कलाकारांनी ७० फुटांची अत्यंत उत्कृष्ट प्रतिमा साकारली आहे. सकाळी १० वाजल्यापासून ही कलाकृती सर्व सामान्य नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. स्पर्शरंग कला परिवाराने साकारलेल्या या भव्य कलाकृतीतून शहीद जवानांना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.