हरिपूजानगर येथे बेकायदेशीर वृक्षतोड…(व्हिडिओ)

0
138

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून अनेक अपार्टमेंट, बंगल्यांच्या परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. वृक्षतोडीसाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असताना परवानगी न घेता शहरातील खानविलकर पेट्रोल पंप समोरील हरिपूजा नगर येथे सुमारे ४० ते ४५ फूट उंचीच्या झांडाची कत्तल करण्यात आली आहे.

त्याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तींवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे.