टोप येथील घरातून तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध साठा जप्त

0
581

टोप (प्रतिनिधी) : टोप परिसरातील राजीव गांधीनगर येथील एका घरातून  अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. शिरोली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. तर घराचा मालक अविनाश भीमराव शिंदे (रा.टोप, ता. हातकणंगले) हा फरार झाला आहे. या कारवाईत सुमारे १२ हजार ९४० रुपयाचा गुटखा जप्त केला. 

मागील आठवड्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शिरोली येथील दोघा जणाकडून मोठा साठा जप्त केला होता. तर काही पान टपऱ्यांवर कारवाई करून साडेआठ हजारांचा गुटखा जप्त केला होता. परंतु ही कारवाई केली असली तरी पान टपऱ्याधारक व दुकानदारांची गुटखा विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे.