कळे येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक : २.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
90

कळे (प्रतिनिधी) : घरात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास कळे पोलिसांनी अटक केली आहे. विजय कृष्णा देसाई (वय ४८, रा. कळे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याचेकडून २ लाख ३५ हजार ७३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनबावडा रोडजवळील ज्योतिरादित्य बिअर शॉपीच्या मागे विजय देसाई याचे घर आहे. या घरात विजय याने देशी-विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा करून त्याची विक्री करत होता. या कामी त्याला त्याची पत्नी आणि तरुण मुलगी मदत करत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता २ लाख ३५ हजार ७३६ रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.