आळते येथे अवैध मद्य जप्त…

0
265

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रामलिंग रोडवर एका पत्र्याच्या  शेडमध्ये अत्यावशक सेवा लिहिलेली एनोव्हा गाडी (एमएच ०९ एक्यू ११३६) या गाडीत २३,०३९ रुपयांचे अवैध मद्य जप्त केले. यावेळी  हातकणंगले पोलीसांनी गाडीसहीत ९ लाख ५० हजारांचा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक के. एन.पाटील यांच्या पथकाने केली.